बँक खातेदारांसाठी अलर्ट ! 31 मेपर्यंत आवर्जून करा हे काम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय ने ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय.

जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे काम 31 मेपर्यंत करावे लागणार आहे. केवायसी 31 मेपर्यंत करा, अन्यथा बँकिंग सेवा बंद होऊ शकेल, असंही बँकेने म्हटले आहे.

ग्राहकांना कोणताही त्रास होऊ न देता बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी 31 मे 2021 पर्यंत केवायसी अद्ययावत करणं आवश्यक आहे, असंही बँकेने स्पष्ट केलं आहे.

बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अधिसूचना जारी केली आहे. ग्राहक त्यांचे केवायसी कागदपत्रे त्यांच्या गृह शाखेत किंवा जवळच्या शाखेत सादर करू शकतात.

कोरोनामुळे बँकेने ही सुविधा 31 मेपर्यंत वाढविली, म्हणजे आता ज्या खातेदारांचे केवायसी 31 मेपर्यंत अद्ययावत केले जाणार नाही, त्यांची खाती गोठविली जातील.

31 मे पर्यंतची दिली डेडलाईन :- कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता एसबीआयने ग्राहकांना त्यांची कागदपत्र पोस्ट किंवा ईमेलद्वारे बँकेत पाठवून केवायसी अद्ययावत करण्याची परवानगी दिलीय. 31 मेपर्यंत अशी खाती गोठवू नयेत, असे बँकेने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना स्पष्ट सांगितलेय

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe