IMD Alert : देशातील अनेक राज्यांमध्ये दिवसेंदिवस हवामान बदलत आहे. त्यामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे तर अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
होळीच्या दिवसापासून अनेक राज्यांमध्ये हवामान बदल पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. 15 मार्च दरम्यान एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे, ज्यामुळे 12 राज्यांमध्ये हवामानात बदल होणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अजूनही महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १४ ते १९ मार्चपर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आताही शेतकऱ्यांना गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांची काढणी लवकरात लवकर करून घेण्यास हवामान खात्याकडून सांगितले आहे.
दिल्लीत आज १२ मार्च रोजी किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 32 अंशांवर नोंदवले गेले आहे. यासोबतच येत्या काही दिवसांत तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मात्र, 14 ते 16 मार्चदरम्यान पावसाचीही शक्यता आहे. IMD नुसार, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा आणि दक्षिण दिल्लीच्या लगतच्या भागात खूप हलका ते हलका पाऊस आणि गडगडाट अपेक्षित आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोरामसह झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे.
IMD ने येत्या काही दिवसांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दक्षिण हरियाणा, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये गडगडाटासह हलक्या पावसाचा इशारा जारी केला आहे.
येत्या काही दिवसांत दिल्लीत कडक ऊन पडणार आहे. मात्र 12 मार्चपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल, लेह लडाख, जम्मू काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.