Maharashtra news:आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर सोलापूर जिल्हा प्रशासनाची खापा मर्जी झाली आहे. विना परवाना गैरहजर आणि अन्य नियमांचा बडगा उगारून झिसले यांच्याकडून ३४ महिन्यांचा पगार वसूल करण्याची कार्यवाहीच प्रशासनाने सुरू केली आहे.
अशा परिस्थतीत राज्य सरकार मात्र डिसले गुरूजींच्या पाठीशी उभे राहिले आहे.प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाल्याचे पाहून डिसले गुरूजी यांनी राजीनाम्याची नोटीस पाठवून दिली. त्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या दोघांना त्यांना आधार दिला आहे. याबद्दल फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही डिसले गुरुजींची बाजू ऐकून घेतल्यानंतर आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यांच्यावर अन्याय होईल, असे कोणतेही पाऊल राज्य शासन उचलणार नाही.
ज्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, ज्याने भारताची ख्याती सर्वदूर पसरवलीये, त्यांच्याबाबतीत चुकीचे काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, यादृष्टीने योग्य आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.