Vastu Tips : प्रत्येकाचे स्वतःचे छोटे का होईना पण घर असण्याचे स्वप्न असते. त्यामुळे अनेकजण दिवसरात्र कष्ट करून पैसे कमावत असतात. या पैशातून त्यांना नवीन स्वप्नातील घर बनवायचे असते.
मात्र घर बांधत असताना अनेकांकडून चुका होत असतात ज्या त्यांना आयुष्यभर सहन कराव्या लागू शकतात. नवीन घर बनताना सर्वात प्रथम वस्तू शास्त्र पाहिले पाहिजे. घराचे तोंड कोणत्या दिशेला योग्य आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

तसेच नवीन घर हे वास्तुशास्त्रानुसारच असावे जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये. घरातील पायऱ्या कोणत्या दिसेल असाव्यात हे देखील वस्तू शाश्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे घरातील पायऱ्या बनवताना योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.
तसेच पायऱ्यांची योग्य दिशा निवडणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. घरामधील आग्नेय दिशा स्वयंपाकघर, विद्युत उपकरणांसाठी योग्य मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोन हा ईशान्य आणि वायव्य दिशेपेक्षा उंच आणि नैऋत्येपेक्षा कमी असावा. घरातील पायऱ्या बांधत असताना त्या कधीही आग्नेय दिशेला बंधू नयेत अन्यथा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
चुकूनही या दिशेला पायऱ्या करू नका
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण, पश्चिम किंवा रात्रीच्या दिशेने पायऱ्या करणे चांगले आहे त्यामुळे नेहमी पायऱ्यांची दिशा याच ठिकाणी असावी. घरातील पायऱ्या बनताना उत्तर, पूर्व, आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बनवू नयेत. जर तुम्ही चुकीच्या दिशेला पायऱ्या बनवल्या तर तुम्हाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागू शकतो. असे केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. तसेच घरामधील सुख शांती देखील नाहीशी होईल.
या दिशेने पायऱ्या करा
घरातील आणि ऑफिसमधील पायऱ्या बनातवाना असताना योग्य दिशा निवडणे तुमच्यासाठी फायद्यचे ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार घर किंवा ऑफिसमधील पायऱ्यांसाठी दक्षिण, पश्चिम दिशा निवडा. जर तुम्ही घरातील पायऱ्या या दिशेला केल्या तर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक स्थिती मजबूत राहील. तसेच तुमच्या घरातील सदस्यांचे आरोग्य देखील निरोगी राहील. त्यामुळे या दिशेला पायऱ्या बनवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.