Online Transaction Alert : कायम लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर आर्थिक नुकसानीसाठी तयार व्हा

Ahmednagarlive24 office
Published:

Online Transaction Alert : देशात डिजिटायझेशन वाढत असून त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधाही वाढत आहेत. एकीकडे डिजिटायझेशनमुळे नागरिकांच्या समस्या संपत आहेत. तर दुसरीकडे फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

सायबर ठगांना संधी मिळताच ते नागरिकांना बळी बनवून काही मिनिटांतच त्यांचे बँक खाते रिकामे करतात. त्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

नंबर 1

ऑनलाइन व्यवहार करत असताना नेहमी OTP द्वारेच पैसे द्या. कारण OTP हा पासवर्ड किंवा इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा जास्त सुरक्षित मानला जातो. ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करताना फसवणुकीपासून दूर राहता येते.

नंबर 2

अनेकजण वेबसाइट किंवा अॅपवरून खरेदी केली तर डेबिट-क्रेडिट कार्डसारखी माहिती तिथे सेव्ह करतात. असे करत असाल तर आजच ही सवय टाळा, कारण ते सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही.

नंबर 3

तसेच तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करता किंवा नेट बँकिंगमध्ये लॉग इन करता तेव्हा ते तुमच्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून करा. तसेच हे काम ऑफिस किंवा इतर कोणत्याही सिस्टीमवर करू नका, कारण तुमचा डेटा हॅक होऊ शकतो.

नंबर 4

तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडून बँकिंग माहिती तसेच OTP शेअर करू नका.नाहीतर तुमचे बँक खाते रिकामं होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe