Reliance Jio : जिओची अप्रतिम ऑफर! 3GB डेटासह मिळणार ‘हे’ भन्नाट फायदे

Ahmednagarlive24 office
Published:

Reliance Jio : भारतातील रिलायन्स जिओ ही दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत नवनवीन ऑफर असणारे रिचार्ज प्लॅन सादर करत असते. लवकरच आयपीएल सुरु होणार आहे. याच पार्शवभूमीवर कंपनीने आपल्या मस्त क्रिकेट प्लॅन आणला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेस प्लॅन्स शिवाय, कंपनीने तीन क्रिकेट डेटा अॅड-ऑन आणले आहेत. कंपनीच्या ग्राहकांना आता अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेता येणार आहेत. यात ग्राहकांना कंपनी 3GB डेटाचा लाभ देत आहे. या प्लॅनची किंमत किती असणार जाणून घ्या.

जिओच्या विशेष रिचार्ज प्लॅनचा फायदा नवीन आणि विद्यमान ग्राहकांना होणार आहे. तसेच यासह वापरकर्त्यांना क्रिकेट पाहण्याचा सर्वोत्तम अनुभव मिळणार आहे. हे लक्षात घ्या की उद्यापासून म्हणजे वापरकर्त्यांना 24 मार्च पासून नवीन जिओ ऑफरचा लाभ घेता येईल.

यासोबत उपलब्ध असणाऱ्या सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळू शकतो, तसेच त्यांना दररोज 3GB डेटा मिळू शकतो. इतकेच नाही तर IPL 2023 सीझन 31 मार्च ते 28 मे पर्यंत सुरू असून ज्या दरम्यान वापरकर्ते JioCinema अॅपवर स्ट्रीम करू शकणार आहे.

निवडू शकता हे तीन प्लॅनमधून

कंपनीच्या या बेस प्लॅन श्रेणीमध्ये 219 रुपये, 399 रुपये आणि 999 रुपये किंमतीचे तीन प्लॅन आहेत. हे प्लॅन अनुक्रमे 14 दिवस, 28 दिवस आणि 84 दिवसांच्या वैधतेसह येतात. तर 219 रुपयांच्या या प्लॅनमध्ये रु. 25 मोफत व्हाउचर (2GB), रु. 399 प्लॅनमध्ये रु. 61 मोफत व्हाउचर (6GB) आणि रु. 999 प्लॅनमध्ये रु. 241 मोफत व्हाउचर (40GB) उपलब्ध आहे. म्हणजेच यात 3GB दैनिक डेटा व्यतिरिक्त, अतिरिक्त डेटा या प्लॅनमध्ये उपलब्ध असणार आहे.

डेटा अॅड-ऑन करता येईल

त्याच्या बेस प्लॅन्स शिवाय, कंपनीने तीन क्रिकेट डेटा अॅड-ऑन आणले असून ज्यांची किंमत अनुक्रमे 222, Rs 444 आणि Rs 667 इतकी आहे. सर्वात स्वस्त 222 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता बेस प्लॅनसारखीच असणार आहे. जो 50GB डेटा ऑफर करतो. तर, दुसरा 444 रुपयांचा प्लॅन 60 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि 100GB डेटा ऑफर करतो. तर तिसर्‍या 667 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 90 दिवसांची असून वापरकर्त्यांना त्यात 150GB डेटाचा लाभ दिला जात आहे.

मिळणार अनलिमिटेड 5G डेटा

दिग्ग्ज टेक कंपनी रिलायन्स जिओ आपल्या नवीन योजनांसह ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ देईल. म्हणजेच, कंपनी या प्लॅन्ससह रिचार्ज केल्यानंतर, जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर Jio ची 5G सेवा तुमच्या क्षेत्रात उपलब्ध असणार आहे, तर तुम्ही अमर्यादित डेटा ऍक्सेस करू शकता. JioCinema अॅपमध्ये प्रवेश केला तर, तुम्ही 4K गुणवत्तेमध्ये सामग्री प्रवाहित करू शकाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe