ध्वजसंहितेमध्ये महत्वाचा बदल, आता राष्ट्रध्वज…

Published on -

India News:आपल्या ध्वजसंहितेनुसार मोकळ्या जागेत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्यास मान्यता होती. यामध्ये आता बदल करण्यात आला असून रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकविता येणार आहे.

त्यामुळे सूर्यास्तापूर्वी राष्ट्रध्वज उतरविण्याची गरज राहणार नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारने काल भारतीय ध्वज संहितेत सुधारणा केली आहे मोकळ्या जागा आणि घरांवर रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी दिली आहे.

या आधी मोकळ्या जागेत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावण्यास मान्यता होती. मात्र आता कुठलाही भारतीय नागरिक राष्ट्रध्वजाचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी तिरंगा फडकवू शकतो.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले आहे. हर घर तिरंगा या मोहिमेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe