‘साई संस्थानच्या अध्यक्षपदी अँड . ढाकणे यांची नियुक्ती करा’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सध्या चढाओढ लागली आहे.

या स्पर्धेत केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांची नियुक्ती करण्याची मागणी आता पुढे आली आहे.

पाथर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहुन तशी मागणी केली आहे. ढाकणे यांना विधानसभा निवडणुकीत परावभव स्विकारावा लागला

त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचे काम केले. गेल्या अनेक वर्षापासुन ते संघर्ष करीत आहेत.

ढाकणेंना साईसंस्थानच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केल्यास विकासाला चालना मिळेल असा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe