अण्णा हजारेंची सरकारकडे ही मागणी, इशारा नव्हे, केलं आवाहन

Published on -

Maharashtra News:आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला इशारा पत्रे लिहिणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारकडे लोकायुक्त कायद्यासंबंधी मागणी केली आहे.

मात्र, त्यासाठी इशारा न देता केवळ आवाहन केले आहे. लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार असून तो आगामी अधिवेशनात मांडावा, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.

ख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हजारे यांनी पत्र पाठविले आहे. लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून मसुदा समितीच्या बैठका झाल्या.

आता या कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. तो राज्य सरकारकडे सादरही केला आहे. आता त्याचे कायद्यात रूपांतर होणे गरजेचे असून त्यासाठी तो अधिवेशनात मांडावा,

अशी मागणी हजारे यांनी केली आहे. या कायद्यासाठी हजारे यांनी आजपर्यंत अनेकदा सरकारला इशारे दिले. अनेकदा आंदोलनेही केली. त्यानंतर आता हा मसुदा तयार झाला आहे. मात्र, त्यावर पुढील प्रक्रिया रखडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe