अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे (Practical Exam) वेळापत्रक जारी केलं आहे.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती ३ मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही २५ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान होणार आहे.
लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे. करोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या ठिकाणी शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.
पण राज्य सरकारच्या निर्णयानंतर सरसकट सर्व जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पाहता या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली होती. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधित घेतली जाणार आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.
दरम्यान, देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशभरात दररोज लाखो रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑफलाइन परीक्षा करणे योग्य नसून टर्म २ बोर्डाची परीक्षा एकतर स्थगित करावी किंवा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम