7th Pay Commission : केव्हाही होईल घोषणा! खात्यात येणार 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीचे पैसे

Published on -

7th Pay Commission : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला होता. परंतु, अजूनही हे कर्मचारी 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीच्या पैशांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपू शकते. कारण सरकार केव्हाही थकीत डीएच्या पैशांची घोषणा करू शकते. सरकारच्या या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप वाढ होईल.

डीएत होणार वाढ

मोदी सरकार आता महागाई भत्ता किती टक्के वाढवणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. माहितीनुसार, यावेळी डीए 4 टक्क्यांनी वाढू शकतो, असे झाल्यास डीए 42 टक्क्यांनी वाढेल.

सध्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के डीएचा लाभ मिळत असून सरकारने 4 टक्के वाढ केली तर वेतनात बंपर वाढ होईल. याबाबत सरकारने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्स जानेवारीमध्ये डीए वाढवला जाईल असे सांगितले जात आहे.

18 महिन्यांची डीए थकबाकी खात्यात जमा होणार

आता डीए थकबाकीचे पैसे लवकरच खात्यात येणार आहेत. कोणत्याही दिवशी सरकार घोषणा करू शकते. सरकारने 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत म्हणजेच 18 महिन्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कोणताही बदल केला नाही.

18 महिन्यांसाठी डीए वाढीवर स्थगिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने एकूण 11 टक्के वाढ लागू केली होती. यानंतर आता कर्मचार्‍यांच्या मागणीवरून अर्थ मंत्रालयाकडून थकबाकी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना डीए आणि महागाई सवलतीच्या स्वरूपात खात्यात येईल. यामध्ये लेव्हल-1 कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी 11,880 ते 37,000 रुपये आहे. तर लेव्हल-13 कर्मचाऱ्यांना DA थकबाकी म्हणून 1,44,200 ते 2,18,200 रुपयांपर्यंत सवलत मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News