WhatsApp Feature : येतेय आणखी एक जबरदस्त फीचर! आता होणार ‘असा’ बदल

WhatsApp Feature : मेटाच्या मालकीचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप सतत फीचरमध्ये बदल करत असते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वापरकर्त्यांवरही व्हॉट्सॲप कारवाई करत असते.

अशातच आता व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना स्टेटस अपडेटची लगेच माहिती मिळणार आहे.

व्हॉट्सॲप सध्या एका जबरदस्त फीचरवर काम करत असून यामुळे वापरकर्त्यांना डेस्कटॉप बीटा वर स्टेटस अपडेट्सची तक्रार करता येईल. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, आता या फीचरमुळे वापरकर्त्यांना स्टेटस विभागात नवीन मेनूमध्ये स्टेटस अपडेट्स रिपोर्ट करण्याची परवानगी मिळेल.

जर वापरकर्त्यांना सेवा अटींचे उल्लंघन करणारे कोणतेही संशयास्पद स्टेट आढळले तर त्यांना एका नवीन पर्यायासह मॉडरेशन टीमला तक्रार करता येईल. रिपोर्टिंग मेसेज प्रमाणेच, स्टेटस अपडेट्स कंपनीकडे मॉडरेशन कारणास्तव फॉरवर्ड केले जाणार आहे त्यामुळे त्यांना उल्लंघन झाले आहे का नाही ते पाहता येईल.

या फीचरमुळे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन खंडित होत नाही. परंतु प्लॅटफॉर्म आणि वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने अहवाल पर्याय सादर करणे गरजेचे आहे.

लवकरच हे फीचर WhatsApp डेस्कटॉप बीटा साठी वापरता येईल. मागील महिन्यात, व्हाट्सएपने काही बीटा परीक्षकांसाठी एक नवीन फीचर आणले आहे यामुळे वापरकर्त्यांना डेस्कटॉपवर ग्रुप चॅटमध्ये प्रोफाइल फोटो पाहता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe