ठाकरेंना आणखी एक धक्का, आणखी एक मंत्री शिंदे गटात

Published on -

Maharashtra Politics : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील बंडखोर गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या काही निकटवर्तीयांचे फोनही नॉट रिचेबल आहेत.

सामंत एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे आठवे मंत्री आहेत.

शिवसेनेतील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गायब झाल्यानंतरही उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याबाबतही कुजबूज सुरू झाली होती. अखेर आज ते गुवाहाटीकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe