अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- उद्धव ठाकरे सरकारला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता याप्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिला जाण्याची शक्यता आहे.
सध्या एनआयए केवळ अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर राज्य दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडीच्या चोरी प्रकरणाचा तपास करत आहे.
मात्र, गेल्या दोन दिवसांतील घडामोडींनंतर आता एटीएसकडे असणारी या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून एनआयएच्या तपासाने वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.
या तिन्ही प्रकरणांच्या केंद्रस्थानी सचिन वाझे हेच आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास एनआयएकडे सोपवण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|