Apple Help To Lower Cholesterol : आता शरीरातील साठलेल्या कोलेस्ट्रॉलला करा रामराम, फक्त रोज सकाळी उठल्यावर करा ‘हे’ काम

Ahmednagarlive24 office
Published:

Apple Help To Lower Cholesterol : जर तुम्हीही वाढत्या कोलेस्टेरॉलले त्रस्त असाल तर आम्ही खास तुमच्यासाठी ही बातमी घेऊन आलो आहे. कारण शरीरासाठी साठलेल्या कोलेस्ट्रॉल हे खूप धोकादायक ठरते.

जेव्हा त्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते तेव्हा ते रक्ताच्या शिरामध्ये जमा होते आणि रक्तप्रवाहावर परिणाम करते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉलची समस्या सातत्याने वाढत असून सर्व वयोगटातील लोक उच्च कोलेस्टेरॉलचे बळी ठरत आहेत.

अशा वेळी आम्ही तुम्हाला एक फळ खाण्याचा सल्ला देणार आहे. याविषयी तुम्ही सविस्तर जाणून घ्या.

दररोज 2 सफरचंद खावेत

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज 2 सफरचंद खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉलची पातळी 40% कमी केली जाऊ शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

संशोधकांच्या मते सफरचंद खाल्ल्याने रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. विशेष म्हणजे वृद्ध लोकांनाही रोज एक सफरचंद खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. दरम्यान हा अभ्यास इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधकांनी 2019 मध्ये केला होता.

सफरचंद कोलेस्ट्रॉल कसे कमी करते?

संशोधकांच्या मते, सफरचंदात पॉलिफेनॉल आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीरात जमा झालेले कोलेस्टेरॉल निघून जाते आणि रक्त प्रवाह चांगला होतो. फायबर आपल्या शरीरात पोहोचते आणि फॅटी ऍसिड तयार करते, ज्यामुळे यकृतामध्ये तयार होणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित होते.

शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल सफरचंदातील पोषक तत्वांमधून काढून टाकले जाते आणि रक्तवाहिन्यांचे काम सोपे होते. यामुळे हृदयाला बळकटी मिळते आणि शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे इतरही मार्ग आहेत तुम्ही जाणून घ्या.

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.
मांसाहाराचे प्रमाण कमीत कमी ठेवावे.
आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
आपली जीवनशैली निरोगी ठेवली पाहिजे.
वेळोवेळी तपासणी करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe