Apple Watch Ultra : ऍपलचे सर्वच उत्पादने खूप महाग असतात. अनेकांची इच्छा असून त्यांना ती खरेदी करता येत नाही. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपले Apple Watch Ultra लाँच केले होते. ज्याची किंमत 89,900 रुपये इतकी आहे. अनेकांना ते महाग असल्याने खरेदी करता आले नाही.
जर तुम्हाला Apple Watch Ultra कमी किमतीत खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. आता तुम्ही ते Flipkart वरून खूप स्वस्तात खरेदी करू शकता. 90 हजार रुपयांचे हे वॉच तुम्हाला सेलमधून 38 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल.

असे स्वस्तात खरेदी करा Apple Watch Ultra
किमतीबद्दल सांगायचे झाले तर लॉन्चच्या वेळी Apple Watch Ultra ची किंमत 89,900 रुपये इतकी होती. परंतु किंमत जास्त असल्याने ऍपल वॉच अनेकांच्या बजेटबाहेर होते, तुम्ही आता 89,900 रुपये मूळ असणारे हे प्रीमियम ऍपल वॉच फ्लिपकार्टवर 74,999 रुपयांच्या विशेष किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आनंदाची बाब म्हणजे त्यावर 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, ग्राहकांना बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन त्याची किंमत 3250 रुपयांपर्यंत कमी करता येईल. समजा, जर तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ घेऊन हे ऍपल वॉच खरेदी केले, तर या ऍपल वॉचची प्रभावी किंमत 51,749 रुपयांपर्यंत खाली येते, याचाच असा अर्थ मूळ किमतीपेक्षा ऍपल वॉच तुम्ही 38,151 रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करू शकता.
जाणून घ्या ऍपल वॉचची खासियत
खरंतर ऍपल वॉच अल्ट्रा जीपीएस आणि सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह येते. यात ईसीजी अॅप, टेम्परेचर सेन्सर, ब्लड ऑक्सिजन आणि फॉल डिटेक्शन सारखी शानदार फीचर्स यात उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे हे वॉच साहसी आणि मैदानी क्रियाकलापांदरम्यान कोणत्याही संकोचशिवाय तुम्ही परिधान करू शकता. या ऍपल वॉचची बॅटरी 36 तासांपर्यंत चालते, असा कंपनीचा दावा आहे. हे ऍपल वॉच 49 मिमी गंज प्रतिरोधक टायटॅनियम केससह येते.