Pension Scheme : अनेकजण जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. तसेच ज्या योजनेत कोणतीही जोखीम नसते त्या योजनेलाही काहीजण प्राधान्य देत असतात. जर तुम्हीही अशीच जबरदस्त योजनेच्या शोधात असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे.
कारण जर तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. या योजनेत अर्ज करणाऱ्यांना प्रत्येक महिन्याला 8 हजार रुपये मिळतील. त्यामुळे बजेट सादर होण्यापूर्वी योजनेत गुंतवणूक करा त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.

अशी आहे योजना
केंद्र सरकार प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माध्यमातून लोकांना ठराविक पेन्शनची हमी देते. गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पेन्शन दिली जाते. ही योजना केंद्र सरकार आणि LIC द्वारे चालवली जाते. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. यात तुम्ही 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.
असे मिळणार पैसे
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर विवाहितांना महिन्याला ८ हजार रुपये पेन्शन मिळते. समजा पती-पत्नी दोघांनी या योजनेत 6-6 लाख रुपये गुंतवले, तर त्यांना महिन्याला एकूण 8 हजार रुपये म्हणजेच दोघांसाठी 4-4 हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला वार्षिक 7.40% व्याज देखील दिले जाते.
रक्कम मिळेल माघारी
तुम्हाला 10 वर्षांसाठी पेन्शन आणि त्यानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम करण्यात येते. समजा, जर तुम्ही 12 लाख रुपये गुंतवले तर ही रक्कम तुम्हाला 10 वर्षांनंतर परत केली जाते.