10 मिनिटांत अप्लाय करा ऑनलाइन पॅन कार्ड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News  :- बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी किंवा आयटी रिटर्न फाइल करण्यासाठी, तसंच इतरही अनेक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक ठरतं.

जर तुम्हीही पॅन कार्ड बनवलं नसेल, तर केवळ 10 मिनिटांत घरबसल्या ऑनलाइन पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता. तसेच एकदा जारी करण्यात आलेलं पॅन कार्ड कायमस्वरुपी वॅलिड असतं. पॅन कार्ड केवळ एकच असतं. एकाहून अधिक पॅन कार्ड बनवणं अवैध आहे.

जाणून घ्या पद्धत
ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर ‘Get New PAN’ निवडा.
इथे आधार नंबर विचारला जाईल आणि रजिस्टर्ड नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
त्यानंतर पुन्हा एकदा OTP वॅलिडेशननंतर e-PAN दिलं जाईल.

पॅन कार्डची या ठिकाणी गरज भासते
आयटी रिटर्न फाइल करण्यासाठी
बँकेत खातं सुरू करण्यासाठी
गाडी खरेदी करण्यासाठी
टेलिफोन कनेक्शन
5 लाख रुपयांहून अधिक दागिने खरेदीसाठी
सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करताना 50000 रुपयांच्या अधिक ट्रान्झेक्शनसाठी
इन्शोसन्स प्रीमियमसाठी
फॉरेन एक्सचेंज, प्रॉपर्टी, लोन एफडी, कॅश डिपॉझिट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe