कुस्तीगीर परिषदेवर पवारांच्या जागी या भाजप खासदाराची वर्णी, अहमदनगरलाही मिळाली संधी

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News:एकएका संस्थेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरही ताबा मिळविता आला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नुकतीच काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. त्या जागी आता भाजप खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तर उपाध्यक्षपदी अहमदनगरचे वैभव लांडगे यांची वर्णी लागणार आहे.नागपूर मध्ये ३१ जुलै रोजी कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये अध्यक्षपदासाठी काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

त्यामुळे अध्यक्षपदी वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे. विशेष म्हणजे तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत.

परिषदेचे उपाध्यक्षपदही ते होते. काकासाहेब पवार सचिव, तर वैभव लांडगे उपाध्यक्षपदी असतील.शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती.

त्यावेळी राजकीय हेतूने हा निर्णय झाल्याचीही चर्चा होती. मात्र, स्वत: पवार यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून पवारांचे वर्चस्व असलेली ही कुस्तीगीर परिषद ताब्यात घेण्यात आता भाजपला यश मिळाल्याचे दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe