APY : लगेचच करा गुंतवणूक! 14 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल हजारोंची पेन्शन, जाणून घ्या डिटेल्स

Ahmednagarlive24 office
Published:
APY

APY : अनेकजण जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम न घ्यावी लागणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. अडचणीच्या वेळी या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक खूप फायदेशीर ठरते. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता.

जर तुम्ही योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला निवृत्तीच्या वेळी जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सरकारच्या काही अद्भुत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यापैकी सरकारच्या या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. या योजना देशभर लोकप्रिय असून या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक आकर्षक फायदे मिळतील.

हे लक्षात घ्या की 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्तीला सरकारच्या अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येतो. या योजनेत नोंदणी केल्यानंतर तुम्हाला किती पैसे गुंतवावे लागतील आणि या रकमेसाठी तुम्ही कोणत्या वयात अर्ज करत असाल त्याच आधारावर ही रक्कम ठरवली जाते हे लक्षात ठेवा.

आता तुम्हाला वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सहज गुंतवणूक करता येईल. अशा परिस्थितीत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतील. समजा तुम्ही आणि तुमच्या पत्नीने मिळून 60 वर्षांसाठी 420 रुपये मासिक गुंतवल्यास दररोज 14 रुपये तुम्हाला बचत करावे लागतील. .

पती-पत्नीचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दोघांनाही 10,000 रुपये पेन्शन देण्यात येईल. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तुम्ही https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.htm या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

समजा तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असावी. जसे की मोबाईल नंबर, ओळख प्रमाणपत्र, आधार कार्ड, पत्ता प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे असतील. त्यामुळे आजच या योजनेत गुंतवणूक करून लाभ घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe