अरे तुमच्या गावच्या ग्रामपंचायती तरी तुमच्या ताब्यात आहेत का ?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा आरोप करण्याचा तुमचा धंदा सुरू आहे. पंचायत समिती, पालिका व जिल्हा परिषदेचा पाच वषांर्चा काळ संपत आल्याने आता जागे झाले तुम्ही आणि आरोप करत आहेत.

मागील दोन तीन महिन्यांपासून आमच्यावर आरोप करण्याचा धडाका विरोधकांनी लावला आहे. पावसाळ्यात जसे डवणे जमिनीतून बाहेर येतात तसे हे राष्ट्रवादीचे दोन-तीन डवणे जमिनीतून बाहेर आले आहेत.

अरे तुमच्या गावच्या ग्रामपंचायती तरी तुमच्या ताब्यात आहेत का ? अशी टीका भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व सभापती सुनीता दौंड यांचे पती गोकुळ दौंड यांनी केली आहे.

दौंड म्हणाले, भालगाव गटात साडेचार वर्षे नारळ न फोडणारे हे सदस्य आहेत. विकासाच्या दृष्टीने एकही रुपयाचे काम करायचे नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर बाराशे कोटींचा हिशेब मागायचा, गेली पन्नास वर्षे लोकांना यांनी झुलवण्याचे काम केले.

वांबोरी चारी पूर्व भागात आणू, ऊसतोडणी कामगारांच्या हातातील कोयता खाली ठेवू, शेतकऱ्यांना सुखी करू,ज्या भगवानगड पाणी योजनेला साधी प्रशासकीय मान्यता मिळाली नाही, तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि त्याचे सत्कार घेत सुटले आहेत.

जे काम मंजूर नाही, त्याचे कार्यक्रम घेत आहेत. आमच्या ताब्यात असणाऱ्या स्थानिक संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करून आमदारांना बाराशे कोटीचा हिशब मागणारे हे कोण आहेत. यांना हिशेब मागण्याचा काहीच अधिकार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe