पूर्ण झोप घेतली तरी दिवसभर थकवा येतोय?, शरीरात असू शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता! आत्ताच व्हा सावध, अन्यथा…

Published on -

पावसाळ्यात अशी भावना अनेकांना भेडसावत असते. दिवसभर कसलंही जड काम न करता देखील अंगात ऊर्जा वाटत नाही, डोकं जड झाल्यासारखं, मूड चिडचिडा आणि हलकासा ताप असावा अशा थकव्याची भावना सतत जाणवते. आपल्याला वाटते की झोप कमी झाली असावी, पण खरं कारण काही वेगळंच असू शकतं आणि ते आहे व्हिटॅमिन डीची कमतरता.

पावसाळ्याच्या काळात ढगाळ हवामानामुळे आपल्याला नैसर्गिक सूर्यप्रकाश फारच कमी मिळतो. सकाळी सुद्धा सूर्य धुसर असतो आणि आपणही पावसाच्या भीतीने घराबाहेर फारसं पडत नाही. परिणामी, आपल्याला मिळणारा व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत जवळपास बंदच होतो.

काय आहे ‘ब्रेन फॉग’?

ही कमतरता मग हळूहळू शरीरावर परिणाम करू लागते. झोप पूर्ण झाली तरी शरीराला ‘फ्रेश’ वाटत नाही, कारण स्नायूंना ऊर्जा पुरवणाऱ्या प्रक्रियांमध्ये अडथळा येतो. यामुळे तुम्ही दिवसभर आळशी, सुस्त आणि काहीही करायचं मन नसलेले वाटू शकता.

व्हिटॅमिन डी केवळ हाडांसाठी नाही, तर संपूर्ण शरीरासाठी आणि मनासाठीही गरजेचं आहे. याची कमतरता स्नायू दुखण्याचं कारण बनते, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करते आणि मानसिक आरोग्यावरही प्रभाव टाकते. हीच कमतरता तुमच्या चिडचिडेपणाचं किंवा सततच्या विसरभोळेपणाचं कारणही असू शकते, ज्याला ‘ब्रेन फॉग’ असं म्हणतात.

ज्या लोकांना दिवसभर थकल्यासारखं वाटतं, जे सहज आजारी पडतात, किंवा ज्यांना हलकासा ताप व हाडांमध्ये जडपणा सतत जाणवतो त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हे केवळ हवामानामुळे होतंय असं समजून गप्प बसल्यास, ही चूक पुढे जास्त त्रासदायक ठरू शकते.

काय उपाय कराल?

सत्य एवढंच की, पावसाळ्यात आहारातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीची मात्रा पुरेशी ठरत नाही. दूध, अंडी, मशरूम किंवा मासे या सगळ्या उपयोगी असल्या तरी, सूर्यप्रकाशाशिवाय शरीराला पूर्णतः गरज भागवणं कठीण होतं. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य सप्लिमेंट्स घ्याव्यात. कोणताही औषधोपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

त्याचसोबत, जेव्हा जेव्हा आकाश थोडंफार उजळतं, तेव्हा किमान 15-20 मिनिटं सूर्यप्रकाशात शांत बसणं, हलका व्यायाम करणं आणि मानसिक विश्रांती घेणं या सगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला हळूहळू थकव्यातून बाहेर काढू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!