चहा-पाण्यासाठी बोलावून अटक केली, संगमनेरात मनसेचा आरोप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध राज्यभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. संगमनेरमध्येही अशीच कारवाई करण्यात आली.

मात्र येथे पोलिसांनी आम्हाला चहा-पाण्यासाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक अटक केली. काहीही संधी न देता लगेच न्यायालयात नेले, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून याबद्दल पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा निषेध करण्यात आला.

संगमनेर येथे मनसे पदाधिकारी शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये पोलिसांचा निषेध करण्यात आला.

त्यांनी सांगितले की, पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना चहा-पाण्यासाठी बोलाविले. तेथे चर्चेचा बनाव केला आणि अचानक धडक कृती दलाच्या पथकांना बोलावून कार्यकर्त्यांना यांना अटक करण्यात आली.

त्यांना रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वांचे मोबाईलही पोलिसांनी बळजबरीने काढून घेतले होते.

सुदैवाने तेथे वकील श्रीराम गणपुले यांची भेट झाली. त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू मांडल्याने सर्वांची सुटका झाली, असे सांगत पोलिसांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News