अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवास आजपासून आरंभ होत आहे. कोरोना प्रतिबंधात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे जारी केले आहेत.
या कारवाईत ६८ जणांना अहमदनगर शहर हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील वर्षापासून प्रतेकजन लढा देत आहे. जवळपास १९ महिन्यांपासून कोरोना रोखण्याच्या उपाययोजना व प्रतिबंधक नियम जारी आहेत.
मागील वर्षी दक्षतेचा उपाय म्हणून गणेशोत्सव सार्वजनीक स्वरूपात साजरा होवू शकला नाही. यावर्षी शासन निर्देशानुसार सार्वजनीक गणेशोत्सव संपन्न होत आहे. याबाबतचे मर्यादांचे नियम जारी झाले आहेत.
आज गणरायांचे आगमन होत असून विघ्नहर्त्याच्या या सणाच्या कालावधीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलिस ठाण्यांकडून नगर प्रांत कार्यालयास प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
या प्रस्तावावर साधक-बाधक विचार करीत नगर प्रांताधिकारी अर्जुन यांनी काल गुरूवार रोजी ६८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जारी केले आहेत.
भिंगार कॅम्प ४५, नगर तालुका १३ आणि एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील १० जणांचा यात समावेश आहे. या सर्वांना उत्सव काळात अहमदनगर शहर,
भिंगार कॅम्प हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईस पात्र राहाल, असा इशारा देखील संबंधितांना या आदेशात देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम