Maharashtra news : राष्ट्रपती निडणुकीसंबंधी काँग्रेससह १८ विरोधी पक्षांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.
त्यानंतर पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांची नावे पुढे आली. आता अचानक काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे आले आहे.
दिल्लीतून निरोप आल्यानंतर शिंदे तातडीने दिल्लीला गेले आहेत.सुशीलकुमार शिंदे यांना २००२ मध्ये भैरवसिंह शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळाली होती. पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकांनी साथ सोडली.
पण शिंदे पक्षासोबत राहिले. त्यामुळेच आता या निवडणुकीसाठी त्यांचे नाव पुढे आल्याचे सांगण्यात येते. विरोधकांकडून राष्ट्रपतीपदासाठी शिंदे सर्वसमावेशक उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे.