अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- श्रावण महिन्यापासून हिंदूंच्या सणाला सुरुवात होते. या सणानिमित्त फुलांना मोठी मागणी असते. यंदा हे चित्र पालटल्याचे दिसत असून, कोरोनाच्या नियमांमुळे धार्मिक स्थळे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहेत. याचा परिणाम फुलांच्या विक्रीवर होत असून, सध्या फुलबाजारात मंदिचे सावट दिसत आहे.
त्यामुळे फुलबाजार कोमेजला आहे. सुपा परिसरातील पाण्याची उपलब्धता असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. सणासुदीच्या काळात फुलांना चांगली मागणी असल्याने फूलउत्पादकांना दरवर्षी चांगले आर्थिक उत्पन्नदेखील मिळते.
परंतू गतवर्षीपासून कोरोना महामारीचा परिणाम जाणवत असून, ग्राहकाअभावी फुलांना मागणी नाही. सध्या फक्त घरगुती देव पुजेसाठीच फुलांची गरज भासत असून, ही फुले परसबागेतदेखील उपलब्ध होत असल्याने श्रावण महिन्यात चलती असणाऱ्या फूलविक्रेत्यांना वाईट दिवस आले असून, त्याचा व्यावसाय संकटात सापडला आहे.
मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांना फुले कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत . पुणे – नगर महामार्गावर सुपा येथील प्रसिद्ध असलेल्या फुलहार विक्रीची अद्यापही सर्व दुकाने सुरू झालेली नाहीत. सोसायट्यांमध्ये हार, फुले पोहचवण्याचे काम अद्याप बंद आहे. याचाही परिणाम फुलविक्रीवर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम