अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- जन्म-मृत्यू नोंदीचा दाखला देताना आधारकार्ड वरील नावाप्रमाणे दाखला देण्यासाठी अर्ज करायला सांगितल्याने एकाने पालिका कर्मचार्याला शिवीगाळ करत मारहाण केली.
हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर पालिकेत घडला आहे. या घटनेचा निषेध म्हणून पालिका कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले.
ज्ञानेश्वर चव्हाण असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत चव्हाण म्हणाले कि, रमजान शहा नावाची व्यक्ती दाखला घेण्यासाठी कार्यालयात आली असता दाखला लिहिताना स्पेलिंग चुकले होते.
त्यामुळे आधारकार्डवर असणार्या स्पेलिंग प्रमाणे दाखला द्यावा, असे रमजान शहा यांचे म्हणणे होते. त्यामुळे कर्मचारी चव्हाण यांनी त्यासाठी रितसर अर्ज लिहून द्यावा, असे शहा यांना सांगितले
. याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ केली.या घटनेनंतर पालिकेतील कर्मचारी एकत्र आले. त्यांनी काम बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.
संबंधित व्यक्तीने घटनेचा केला खुलासा;- याप्रकरणी रमजान शहा म्हणाले कि, आधार कार्ड देऊन ही सून आणि मुलाचा दाखला चुकवला होता म्हणून मी आज दाखला दुरुस्तीसाठी पालिकेत गेलो होतो. त्यावेळी चव्हाण यांनी मला अर्ज करायला सांगितला.
आधार कार्ड देऊन तुम्ही दाखल्यातील नाव चुकवले. त्यामुळे तुम्हीच दाखला दुरुस्त करून द्यावा, असे मी त्यांना म्हणालो तर त्यावर चव्हाण यांनी माझ्याशी अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वादाचा प्रकार घडल्याचे शहा यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम