मुस्लिम समजून जैन व्यक्तीची हत्या, पहा कोठे घडली घटना?

Ahilyanagarlive24 office
Published:

India News : एका वृद्ध व्यक्तीला ‘तुझे नाव मोहम्मद आहे, आधार कार्ड दाखव’ असे म्हणत मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात ही व्यक्ती मुस्लिम नसून जैन असल्याचे उघड झाले. त्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून फार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. मध्य प्रदेशमधील नीमच जिल्ह्यात ही घटना घडली. तेथे भंवरलाल जैन (रा. सरसी, रतलाम) या वृद्धाचा मृतदेह आढळून आला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये एक व्यक्ति पीडिताला त्याची ओळख विचारून त्याला मारहाण करताना दिसत आहे.

ज्यांना मारहाण होत होती, ते भंवरलाल जैन राजस्थानमधील चित्तौडगढ येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते, मात्र त्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह नीमच जिल्ह्यातील रामपुरा रोडवर आढळला होता.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी पीडिताला वारंवार थप्पड मारत आहे, त्याच्याकडे आधार कार्ड मागत असून त्याला विचारत आहे की, तुझे नाव मोहम्मद आहे. प्राथमिक माहितीनुसार व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव दिनेश असून तो मनासा येथील रहिवासी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe