अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा त्यांनी दौरा केला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या.
याबाबतच सविस्तर वृत्त असे कि, जिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी आज तालुक्यातील कोळगाव येथील आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट दिली. वैद्यकीय अधिकारी तेथे उपस्थितीत नव्हते.
सध्या कोरोनाचा काळ असल्याने सगळ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश असतानाही ते गैरहजर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी तहसीलदार पवार तेथे पोचले. त्यांना पाहताच जिल्हाधिकारी म्हणाले, अहो मी अचानक भेटीला आलो आहे,
तरी आपण येथे हजर कसे त्यावर पवार यांनी ‘आम्हीही भेटी देतोय’ असे म्हणताच जिल्हाधिकाऱ्यांनी हा योगायोग नाही, आपण कोरोनातील कामात लक्ष द्यायला हवे असे सांगत उपकेंद्रातील कामकाज पाहायला सुरुवात केली.
त्यावेळी महत्वाचे कुणीच तेथे उपस्थितीत नसल्याने सगळाच गोंधळ उडाला. काही लोक कोरोना चाचणी करण्यासाठी आले होते. मात्र कुठल्याही नोंदी न सापडल्याने जिल्हाधिकारी संतापले. तहसीलदार पवार यांना फैलावर घेत तुमचे लक्ष नसून कामाची पध्दत सुधारा असा सल्लाही त्यांनी दिला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|