Bank Holiday : ग्राहकांनो लक्ष द्या… पुढच्या महिन्यात 12 दिवस बंद राहणार बँका, आजच पूर्ण करा तुमची कामे

Published on -

Bank Holiday : जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी बातमी खूप कामाची आहे. कारण पुढच्या म्हणजे मार्च महिन्यात बँकांना एकूण 12 दिवस सुट्टी असणार आहे. ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देत असते.

पुढच्या महिन्यातीलही सुट्ट्यांची यादी या बँकेने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे जर तुमचे कोणते काम असेल तर ते आजच पूर्ण करा, शिवाय ही सुट्ट्यांची यादी पाहूनच बॅँकेत जा. नाहीतर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.पुढच्या महिन्यात किती दिवस बँक बंद असणार पाहुयात सविस्तर.

इतके दिवस बंद राहणार बँका

3 मार्च 2023: मिझोराममधील चपचर कुट येथे शुक्रवारी बँका बंद राहणार आहेत.

7 मार्च 2023: महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, श्रीनगर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू, श्रीनगर, तेलंगणा आणि झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत.

8 मार्च 2023: त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, मध्य प्रदेश, ओरिसा, चंदीगड, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बेंगामध्ये बँका बंद राहणार आहेत.

3 मार्च 2023: बिहारमध्ये बँका बंद राहणार आहेत.

22 मार्च 2023: गुढी पाडवा/उगादी सण/बिहार दिन/साजिबू नोंगमापनबा (चेरोबा)/तेलुगु नववर्षाचा दिवस/पहिली नवरात्र – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, गोवा, बिहार आणि या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

30 मार्च 2023: श्री राम नवमी – देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

या आहेत साप्ताहिक बँक सुट्ट्या

5 मार्च 2023: रविवार

11 मार्च 2023: शनिवार

12 मार्च 2023: रविवार

19 मार्च 2023: रविवार

25 मार्च 2023: शनिवार

26 मार्च 2023: रविवार

राज्यांनुसार सुट्ट्यांची वेगळी यादी

हे लक्षात घ्या की बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये एकसारखी नसते. राज्यानुसार सुट्ट्यांची वेगळी यादी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, वेगवेगळ्या राज्यांसाठी सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

ऑनलाइन करता येणार काम

बँका बंद असल्या तरी काळजी करू नका. कारण बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्याने ग्राहकांना कोणतीही अडचण येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe