TVS Zeppelin R : TVS ने बनवली भन्नाट बाईक! स्कूटरच्या किमतीत करू शकता खरेदी, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

TVS Zeppelin R : TVS ही भारतीय ऑटो बाजारातील दिग्ग्ज कंपनी आहे. कंपनी सतत नवनवीन वाहने सादर करत असते. अशातच आता कंपनी आपली नवीन TVS Zeppelin R बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही बाईक तुम्ही आता स्कूटरच्या किमतीत खरेदी करू शकता.

ही पेट्रोल इंजिन बाईक आहे. परंतु, जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण सध्या या बाईकची चाचणी सुरु आहे. यात कंपनी कोणते फीचर्स देणार? तिची किंमत किती असणार? पाहुयात सविस्तरपणे.

नवीन बाईकमध्ये मिळणार उच्च आणि रुंद हँडलबार

कंपनीने आपली पहिली क्रूझर बाईक TVS Zeppelin R बनवली असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची किंमत कोणत्याही स्कूटरइतकीच आहे. याला क्रूझर फील देण्यासाठी, त्याला उंच आणि रुंद हँडलबार, इंजिन-फेसिंग फूटपेग, मोठा व्हीलबेस आणि रिसेडर सीटिंग पोझिशन कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून लांबच्या राईडवर बसणाऱ्या व्यक्तीला कमी थकवा जाणवेल.

मिळणार 5 स्पीड गिअरबॉक्स

TVS Zeppelin R ला TVS Ronin असेही म्हटले जाते. सध्या त्याची चाचणी सुरू असून ही 225cc सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन बाईक आहे. यात सौम्य हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. इतकेच नाही तर यात 48 व्होल्टची लिथियम आयन बॅटरी मिळत आहे. ज्याची पॉवर क्षमता 20 Bhp आहे आणि ती 19.93 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाइकला 5 स्पीड गिअरबॉक्स मिळतील. बाईकची EV आवृत्ती देखील लवकरच येणार आहे.

नवीन बाईक चार प्रकार आणि 6 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असणार

नवीन बाईकला एलईडी हेडलॅम्प, फ्लॅट ट्रॅक स्टाईल हँडलबार, स्प्लिट सीट, 17-इंच फ्रंट आणि 15-इंच मागील चाक दिले जाईल. या बाईकमध्ये इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, स्मार्ट बायो की, यूएसजी फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक युनिट, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स दिले जातील. सध्या, या कंपनीकडून त्याच्या लॉन्च तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

ही बाईक जानेवारी 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते. ही बाईक बाजारात 1.49 लाख रुपये ते 1.70 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असणार आहे. ती चार प्रकारांमध्ये आणि 6 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. तसेच बाईकमध्ये 14 लिटरची इंधन टाकी दिली असून बाईक 42.95 Kmpl मायलेज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe