OnePlus 5G Smartphone : मस्तच! वनप्लसचा 5G स्मार्टफोन झाला 24,000 रुपयांनी स्वस्त

Published on -

OnePlus 5G Smartphone : दिग्ग्ज टेक कंपनी वनप्लसने नुकताच आपला OnePlus 10T 5G हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत 54,999 रुपये इतकी आहे. यात कंपनीने जबरदस्त फीचर्स दिली असल्याने अनेकांना तो स्मार्टफोन आपल्याकडे असावा असे वाटते.

परंतु, या फोनची किंमत जास्त असल्याने काहींना तो विकत घेता येत नाही. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हीही हा फोन स्वस्तात विकत घेण्याच्या विचारात असाल तर काळजी करू नका. तुम्ही Amazon India वर उपलब्ध असणाऱ्या ऑफरमुळे स्वस्तात फोन घेऊ शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये 18,050 रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करता येईल. या सर्व ऑफरसह,या स्मार्टफोनवर सवलत एकूण 24,000 रुपयांपर्यंत जात आहे. तसेच हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या फीचर आणि स्पेसिफिकेशन

जर स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असणार आहे. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी प्रोसेसर म्हणून, त्यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेट उपलब्ध करून देत आहे. वनप्लसच्या या तगड्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा फुल एचडी + फ्लुइड AMOLED डिस्प्ले मिळत असून, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या स्मार्टफोनमध्ये कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास दिला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे असणार आहेत. तर यात 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळत आहे.

यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असून फोनमध्ये 4800mAh बॅटरी आहे. जी 150W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. जर OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर काम करतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe