New Super Pension Plan : जबरदस्त योजना! गुंतवा फक्त 4000 रुपये आणि मिळवा कोट्यवधी रुपयांसह पेन्शन

Ahmednagarlive24 office
Published:

New Super Pension Plan : अनेकजण आपल्या चांगल्या भविष्यासाठी कोणत्याही जोखमेशिवाय आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यापैकी काही योजना गुंतवणूकदारांना अतिशय कमी गुंतवणुकीत करोडपती बनवतात.

त्याशिवाय महिन्याला पेन्शनही मिळवतात. दिवसेंदिवस वाढती महागाई लक्षात घेऊन जोखमेशिवाय जास्त परतावा देणारी योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

सध्या बऱ्याच योजना असून त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजना होय. या योजनेमुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील त्याचबरोबर तुम्ही काही दिवसातच करोडपती व्हाल. त्याशिवाय तुम्हाला महिन्याला पेन्शनचा लाभ घेता येईल.

लवकरात लवकर करा गुंतवणूक

करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. उदाहरणाद्वारे सांगायचे झाले तर, तुम्ही वयाच्या 26 व्या वर्षी NPS मध्ये महिन्याला 4,000 रुपये गुंतवण्यास सुरुवात केली आणि ती गुंतवणूक वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत असे करत राहिला तर तुम्हाला महिन्याला 35,000 रुपये पेक्षा जास्त पेन्शन मिळवू शकता. ही गणना 11% व्याज दराने केलेली आहे.

त्याचबरोबर जर तुम्ही वयाच्या 26 व्या वर्षी गुंतवणूक केली, तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी 16,32,000 रुपये इतकी गुंतवणूक करू शकाल.तुमच्याकडे एकूण 1,77,84,886 रुपये असतील.

तुम्ही फक्त 16,32,000 रुपयांचे योगदान दिले आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला जवळपास 2 कोटी रुपये मिळू शकतात. त्यामुळे, तुम्हाला रु. 1,06,70,932 चे एकरकमी पेमेंट आणि अंदाजे रु. 35,570 प्रति महिना पेन्शन मिळण्याची दाट शक्यता आहे.

करोडो रुपये मिळण्याची सुवर्णसंधी

तुम्ही वयाच्या 61 व्या वर्षी सुमारे 35,000 रुपये मासिक पेन्शन मिळण्याव्यतिरिक्त, तुम्हाला 1 कोटींहून अधिक रक्कम एकरकमी पेआउट मिळेल. म्हणजेच तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या वर्षांसाठी नियोजन करू शकाल.

राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक सरकारी योजना असल्यामुळे या योजनेत तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी जबरदस्त परतावा मिळतो. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe