LIC : जबरदस्त स्कीम! तुम्हीही 253 रुपये वाचवून मिळवू शकता 54 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

Pragati
Published:

LIC : भारतातील सगळ्यात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अनेक योजनांमध्ये लाखो नागरिक गुंतवणूक करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांमध्ये प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी काही ना काही तरतूद असतेच असते.

जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीनंतर मोठा निधी जमा करु इच्छित असल्यास तुमच्यासाठी एलआयसीची ही पॉलिसी तुमच्या फायद्याची आहे. जीवन लाभ योजना असे या योजनेचे नाव असून यात तुम्ही दररोज 253 रुपये बचत करुन मॅच्युरिटीवेळी 54 लाख रुपये मिळवू शकता.

तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करून 54 लाख रुपयांचा निधी गोळा जमा करायचे असतील तर तुम्हाला ही योजना 25 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करावी लागणार आहे.

जर तुम्ही दररोज 253 रुपयांची बचत करत असाल आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला सुमारे 7,700 रुपये म्हणजेच प्रत्येक वर्षी 92,400 रुपये प्रीमियम भरला तर तुम्ही 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी 54 लाख रुपये गोळा करू शकता.

या योजनेत किमान 18 आणि कमाल 59 वर्षांचे लोक LIC जीवन लाभ योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर योजनेचा लाभ नामनिर्देशित व्यक्तीला दिला जातो. नॉमिनीला बोनससह विमा रकमेचाही लाभ देण्यात येतो.

जर तुम्ही ही योजना 21 वर्षांच्या मुदतीसाठी निवडली तर पॉलिसी खरेदी करताना तुमचे वय 54 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तर 25 वर्षांच्या मुदतीसाठी, वयोमर्यादा 50 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच , परिपक्वतेची कमाल वयोमर्यादा 75 वर्षे निश्चित केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe