Ayushman Card : आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) ही योजना संपूर्ण देशभर चालवली जात आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
परंतु, त्यासाठी तुमच्याकडे आयुष्मान कार्ड (Ayushman Health Card) असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड नसेल तर काळजी करू नका, आता घरबसल्या हे कार्ड तुम्ही बनवू शकता.
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता:-
1 ली पायरी
तुम्ही आयुष्मान योजनेचे लाभार्थी (Beneficiaries of Ayushman Yojana) असाल तर तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त http://pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर येथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
पायरी 2
त्यानंतर समोर एक नवीन पेज येईल, जिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक (Aadhaar Number) टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या अंगठ्याचे ठसे Verify करा आणि आता ‘मंजूर लाभार्थी’ या पर्यायावर क्लिक करा.
पायरी 3
यानंतर तुम्हाला मंजूर गोल्ड कार्डची (Gold Card) यादी दिसेल. जिथे तुम्हाला तुमचे नाव शोधावे लागेल. त्यानंतर कन्फर्म प्रिंट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला CSC Valet मध्ये तुमचा पासवर्ड टाकावा लागेल.
पायरी 4
आता तुम्हाला तुमचा पिन टाकावा लागेल आणि नंतर होम पेजवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला कार्डधारकाच्या नावावर आयुष्मान कार्ड डाउनलोडचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता.