Baba Venga Gold News : दिवाळीच्या सणानिमित्ताने सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. घरोघरी फराळाचा सुवास दरवळतोय. फराळा सोबतच नवीन कापडे आणि दाग दागिन्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे.
आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांनी सोन्याचे तसेच चांदीचे दागिने खरेदी केले असतील. तर काही लोक गुंतवणुकीसाठी देखील या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. दरम्यान जर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

आज आपण पुढील वर्षी सोन्याची किंमत किती रुपयांपर्यंत वाढू शकते याबाबत बाबा वेंगा यांचे भाकित काय सांगते याविषयी माहिती पाहणार आहोत. खरंतर सध्या सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहे. सोन्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये प्रति तोळा अशी आहे.
या वर्षी सोन्यात भयानक तेजी दिसून आलीये. हा मौल्यवान धातू यावर्षी देशाच्या स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि ईटीएफमधील गुंतवणूक या सर्व गोष्टींमुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
सोन्याची किंमत ही जागतिक राजकारण, डॉलरची ताकद आणि अर्थव्यवस्था या सर्व घटकांवर अवलंबून असते. परंतु यावर्षी भुराजकीय तणाव, अमेरिकेचे कर धोरण व इतर काही अनिश्चित परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीत अनपेक्षित वाढ पाहायला मिळाली.
पण आता ही सगळी अनिश्चितता दूर होत चालली आहे आणि यामुळे सोन्याच्या किमतीवर प्रचंड दबाव वाढला आहे. जगभरातील देशांमधील सेंट्रल बँका सोन्याचे प्रचंड खरेदी करताना दिसत आहेत पण तरीही गुंतवणूकदार आता सावध भूमिका घेताना दिसतायेत.
काही गुंतवणूकदार सोन्याच्या किमती विक्रमी भाव पातळीवर पोहोचल्यानंतर विक्रीच्या तयारीला लागले आहेत. अशा या परिस्थितीत पुढील वर्षी सोन्याच्या किमती किती राहतील याबाबत गुंतवणूकदारांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता बाबा वेंगा यांची भाकणूक चर्चेत आली आहे.
त्यांनी 2026 मध्ये सोन्याला काय भाव मिळेल याबाबत मोठं भाकीत सांगितलंय. पुढील वर्षी जागतिक आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चलन व्यवस्थेत व्यत्यय, बँकिंग संकट आणि बाजारात तरलतेचा अभाव निर्माण होईल असं म्हटलं जातंय.
यामुळे पुढील वर्षी सोन्याच्या किमती आणखी वाढणार असा बाबा वेंगा यांच भाकीत आहे. आर्थिक अस्थिरतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बहुतांश लोक सोन्यात गुंतवणूक करतात. पुढील वर्षी देखील आर्थिक संकट उभे राहणार आणि यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढणार अशी शक्यता आहे.
अलीकडेचं उभ्या झालेल्या आर्थिक संकटात सोन्याच्या किमती तेच ते पन्नास टक्क्यांनी वाढल्या होत्या. आता बाबा वांगाच्या भाकितानुसार जर 2026 साली आर्थिक मंदी पुन्हा डोकं वर काढू लागली तर सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढतील असं म्हटलं जात आहे. पुढील वर्षी दिवाळीत दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख 62 हजार ते एक लाख 80 हजार रुपये होईल असा अंदाज सांगितला जातोय.