बाळासाहेब नाहाटा यांच्यावर टीका करताना राजेंद्र नागवडे यांची जीभ घसरली…

Updated on -

स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना एकवीस संचालक मंडळाच्या जागांसाठी मतदान झाले होते.सोसायटी मतदार संघात नागवडे यांनी मोठा विजय मिळवत बाळासाहेब नाहाटा यांना चितपट केले.

दरम्यान राजेंद्र नागवडे यांना भान राहिले नाही, जल्लोष करताना मिरवणुकीत त्यांची जीभ घसरली त्यांनी चक्क सोसायटी मतदारसंघात बाळासाहेब नाहाटाला गाडला ! असे शब्दप्रयोग केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नागवडे यांना आव्हान देणारे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, केशव मगर यांचाही समावेश आहे.

निकालानंतर जल्लोष करताना नागवडे यांनी सोसायटी मतदार संघात बाळासाहेब नाहटांना गाडला अशी आरोळी ठोकत आनंद व्यक्त केला. या आरोळीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe