Bank FD : ग्राहकांची चांदी ! ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने वाढवले एफडीवरील व्याजदर, पहा किती होणार फायदा?

Published on -

Bank FD : एफडी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. एफडीमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. यात आपल्याला पुन्हा-पुन्हा गुंतवणूक करण्याची गजर नाही. एफडीमध्ये एकदा गुंतवणुक केल्यानंतर बँका ठेवींवर व्याज देतात. जितके जास्त व्याज तितका नफा जास्त.

बँका हे दर वारंवार बदलत असतात. सणासुदीच्या काळात अनेक बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचाही या यादीत समावेश आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर व्याज वाढवले ​​आहेत. बँकेचे नवीन व्याजदर पुढीलप्रमाणे :-

ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ

ही स्मॉल फायनान्स बँक (SFB) सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सामान्य नागरिकांना 4.50% ते 9% व्याज देत आहे. तरज्येष्ठ नागरिकांसाठी दर 4.50% ते 9.5% पर्यंत आहेत.

‘या’ एफडीवर सार्वधिक व्याज उपलब्ध

सर्वाधिक व्याज 1001 दिवसांच्या ठेवींवर उपलब्ध आहे. सामान्य नागरिकांसाठी ९% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ९.५% व्याजदर आहेत. तर ७०१ दिवसांच्या मुदतीवर सर्वसामान्य नागरिकांना ८.९५% तर ज्येष्ठ नागरिकांना ९.४५% व्याज मिळत आहे. ५० दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना ८.७५% तर ज्येष्ठ नागरिकांना ९.२५% व्याज मिळत आहे. 202-364 दिवसांच्या FD वर, बँक सर्वसामान्य नागरिकांना 8.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25% व्याज देत आहे.

1 वर्षाच्या एफडीवर मिळत आहे 7% पेक्षा जास्त व्याज

सामान्य नागरिकांसाठी 1 वर्षाच्या FD वर 7.35%, 1 वर्ष 1 दिवसाच्या ठेवींवर 7.35%, 1 वर्ष 1 दिवस ते 500 दिवसांच्या FD वर 7.35%, 502 दिवस ते 18 महिने FD वर 7.35%, 18 महिने ते 7.40% 700 दिवसांच्या मुदतीवर , 702 दिवस ते 1000 दिवसांच्या मुदतीवर 7.40%, 1002 दिवस ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.65%, 3 वर्षे ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 7.65% आणि 5 वर्षे ते 10 वर्षे मुदतीवर 7% व्याज मिळत आहे.

एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी व्याजदर

7-14 दिवसांच्या FD वर 4.50%, 15 ते 45 दिवसांच्या FD वर 4.75%, 46 ते 60 दिवसांच्या FD वर 5.25%, 61 ते 90 दिवसांच्या FD वर 5.50% आणि 165 दिवस ते 6 महिन्यांच्या ठेवींवर 5.75% व्याज मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!