Bank FD : नोकरी करणारे अनेकजण आपल्या कुटुंबासाठी वेगवगेळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यामध्ये सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही FD मध्ये देखील गुंतवणूक करू शकता.
कारण आता काही बँका आपल्या ग्राहकांना FD गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज देत आहेत. त्यात जर तुम्हीही गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही FD मधून चांगली कमाई देखील करू शकता. सध्या अशा बँका आहेत ज्या तुमच्या ठेवींवर सर्वात जास्त व्याज देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या यादीत सरकारी ते खासगी बँकांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. जाणून घेऊया सविस्तर….
कॅनरा बँक एफडीचे व्याज दर
कॅनरा बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी, सर्वसामान्य ग्राहकांना 4 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत असून 444 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वात जास्त 7.25 टक्के व्याजदर देत आहे.
बँक ऑफ बडोदा एफडीचे व्याज दर
ही बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी, नियमित ग्राहकांसाठी 3 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.5 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत आहे.
फेडरल बँक एफडीचे व्याज दर
फेडरल बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी, आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना 3 टक्के ते 7.3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्के ते 7.8 टक्के व्याजदर देत आहे. दरम्यान, हे व्याजदर 1 सप्टेंबर 2023 पासून लागू आहेत.
इंडसइंड बँक एफडीचे व्याज दर
इंडसइंड बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी, आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना ३.५ टक्के ते ७.५ टक्के तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.२५ टक्के ते ८.२५ टक्के व्याजदर देत असून नवीन दर 5 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत.
पंजाब नॅशनल बँक एफडी दर
पंजाब नॅशनल बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी, सर्वसामान्य ग्राहकांना 3.5 टक्के ते 7.25 टक्के तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत असून 444 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वात जास्त 7.25 टक्के व्याजदर देत आहे.