Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Bank Fraud

Bank Fraud : सावधान! ‘या’ बँकेच्या ग्राहकांनी वेळीच व्हा सावध, नाहीतर होईल लाखोंची फसवणूक

Friday, October 20, 2023, 3:08 PM by Ahilyanagarlive24 Office

Bank Fraud : सध्या प्रत्येकाकडे बँक खाते आहे. प्रत्येक बँकेचे व्याजदर आणि सुविधा वेगवेगळ्या असतात. जर तुम्ही कोणत्या बँकेत खाते चालू करणार असाल तर तुम्ही त्यापूर्वी बँकेच्या सर्व नियमांची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

अलीकडच्या काळात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्राहकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ICICI बँकेच्या ग्राहकांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे.

Bank Fraud
Bank Fraud

बँकेकडून देण्यात आली महत्त्वाची माहिती

याबाबत बँकेकडून सांगण्यात आले आहे की, आयसीआयसीआय ग्राहकांनी अशा कोणत्याही फोन कॉलवर त्यांचे तपशील चुकूनही देऊ नये ज्यात क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची चर्चा केली जात आहे. यामध्ये तुमचा OTP, पासवर्ड किंवा CVV यासह कोणतीही माहिती चुकूनही देऊ नका. बँक आपल्या ग्राहकांना चुकूनही असा कोणताही कॉल करत नाही. समजा तुम्ही माहिती शेअर केली तर तुमचे बँकेत ठेवल्यास पैसे चोरीला जाण्याची शक्यता आहे.

ICICI बँकेच्या नावाने होतेय फसवणूक

हे लक्षात घ्या की आजकाल ICICI च्या नावाने कॉल जवळपास सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचत असून ग्राहक त्यांची क्रेडिट कार्ड मर्यादा तपासण्यासाठी त्यांचे सर्व तपशील देखील लगेचच शेअर करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीकडे ग्राहकाचे नाव आणि नंबर पूर्वीपासूनच असतो, यामुळे लोकांवर विश्वास ठेवणे सोपे होऊन जाते.

अशी करा सायबर गुन्ह्याची तक्रार

समजा तुम्हाला कोणत्याही सायबर गुन्ह्याची तक्रार करायची असल्यास तर तुम्ही cybercrime.gov.in वर तक्रार करता येईल. इतकेच नाही तर तुम्हाला 1930 हेल्पलाइनवर कॉल करून माहिती देता येईल. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जितके जागरूक असल्यास तितके तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित असतील.

Categories ताज्या बातम्या Tags bank account, Bank Alert, Bank Fraud, ICICI, ICICI Bank, ICICI Bank Alert
Business Idea : सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय करून लाखो रुपये कमवा ! सुरवात कशी करावी? लायसन्स कसे काढावे? किती कमाई होईल ? जाणून घ्या सविस्तर
जगात प्रथमच पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन !
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress