Bank Holidays : सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (List of Bank Holidays) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.
त्यामुळे पुढील महिन्यात बँकेशी संबंधित काही काम (Bank work) असेल तर सुट्टी तपासून बँकेत जा. नाहीतर तुमचे काम होणार नाही.

या सुट्यांमुळे ऑनलाइन बँकिंग सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही
देशातील विविध राज्यांतील स्थानिक सणांच्या (Local festivals) आधारे बँकांच्या सुट्या निश्चित केल्या जातात. अशाप्रकारे सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका बंद राहतील.
मात्र या बंदचा बँकांच्या ऑनलाइन सेवांवर (Online Services) कोणताही परिणाम होणार नाही. शाखा बंद (Branch closed) राहिल्या तरी ऑनलाइन सेवांद्वारे कामकाज सुरू राहणार आहे.
सप्टेंबर महिन्यात बँक सुट्ट्या
१ सप्टेंबर – गणेश चतुर्थी
4 सप्टेंबर – रविवार
6 सप्टेंबर – कर्मा पूजा, झारखंड
7 आणि 8 सप्टेंबर – ओणम (तिरुवनंतपुरम-कोची)
९ सप्टेंबर – इंद्रजाता (गंगटोक)
10 सप्टेंबर – श्री नरवना गुरु जयंती (तिरुवनंतपुरम-कोची)
11 सप्टेंबर – रविवार
18 सप्टेंबर – रविवार
21 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी दिवस (तिरुवनंतपुरम-कोची)
24 सप्टेंबर – चौथा शनिवार
25 सप्टेंबर – रविवार
26 सप्टेंबर – नवरात्री