मुंबई : तुम्हाला जर घर दुरुस्त (Home repaired) करायचे असेल किंवा त्यात कोणतेही नूतनीकरणाचे काम करायचे असेल तर त्याच्यासाठी कर्जाची (Loan) सुविधा उपलब्ध आहे.
आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या संदर्भात सांगितले की प्राथमिक सहकारी बँका (Cooperative Banks) महानगरांमधील लोकांना त्यांच्या घरांच्या दुरुस्ती किंवा बदलासाठी १० लाख रुपयांपर्यंत (Rs. 10 lakhs) कर्ज देऊ शकतात.

यापूर्वी घर दुरुस्तीसाठी कर्जाची मर्यादा किती होती?
यापूर्वी अशा बँकांसाठी घर दुरुस्ती किंवा बदलासाठी कर्ज मर्यादेत सप्टेंबर २०१३ मध्ये सुधारणा करण्यात आली होती, ज्याअंतर्गत ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये (City Area) २ लाख रुपयांपर्यंत आणि शहरी भागात ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते.
परंतु आता ही मर्यादा वाढली आहे. वाढले आहे. RBI ने प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांसाठी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “अशा कर्जाची मर्यादा आता १० लाख रुपये करण्यात आली आहे.
ज्या शहरांमध्ये आणि केंद्रांची लोकसंख्या १० लाख किंवा त्याहून अधिक आहे, तेथे १० लाख रुपयांची मर्यादा आहे. इतर केंद्रांसाठी ही मर्यादा ६ लाख रुपये आहे.
ज्यांच्याकडे घर दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, त्यांना याचा लाभ मिळेल
ज्या लोकांकडे घर आहे पण जुने घर आहे, ज्यांना दुरुस्तीची गरज आहे, त्यांना घराच्या दुरुस्तीसाठी आरबीआयने दिलेल्या कर्जाच्या मर्यादेत वाढ केल्याने फायदा होईल. अशा लोकांकडे घर दुरुस्तीसाठी पैसे नसतील तर ते आता १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊन घराची दुरुस्ती करू शकतात.