बँक मॅनेजरचा मुजोरपणा… आक्रमक ग्रामस्थांनी दिला बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेला ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

या शाखेतील बँक मॅनेजर मुजोरी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, साकुर मधील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेतील 40 ते 42 हजार खातेदारांच्या सेवेसाठी बँकेत केवळ तीनच कर्मचारी आहेत.

कमी स्टाफ असल्या कारणाने नागरिकांना बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान साकुर ग्रामपंचायतीतर्फे सेंट्रल बँक ऑफ इंडिया जिल्हा शाखा प्रमुख व साकुर सेंट्रल बँकच्या शाखा प्रमुखांचे ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली,

मिटिंगमध्ये काहीही निष्पन्न झाले नसल्याने शाखा मँनेजर यांनी उडवा- उडवीची उत्तरे व मजुरी सर्वसामान्य खातेधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे आता ग्रामस्थांनी देखील आक्रमक पवित्र स्वीकारला आहे. येत्या आठ दिवसात सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा साकुर कामकाज सुरळीत करून स्टाफचे वर्तणूक बदलली नाही तर साकुर ग्रामस्थांच्यावतीने साकुर शाखेला टाळे लावुन बंद करण्याचा व आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe