बापरे…दुर्बिणीने निरीक्षण करून क्रिकेटवर सट्टा, ३३ जण जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-  एमसीएच्या गहुंजे येथील ( पुणे) स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दुसरा सामना सुरू होता. त्यावेळी बेटिंग सुरू होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचे आरोपी दुर्बिणीने निरीक्षण करीत होते.

त्यामुळे प्रत्येक बॉलचा खेळ त्यांना थेट पाहता येत होता. त्या खेळाचे लाईव्ह टेलिकास्ट होण्यासाठी सहा सेकंदांचा अवधी लागतो. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी एका ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा घेत होते.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईमध्ये महराष्ट्रासह परराज्यातील ३३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाकड पोलिसांनी शुक्रवारी(दि. २६) रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली.

याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार तीन पथके तयार करून मामुर्डी गाव, घोरवडेश्वर डोंगर आणि विमाननगर परिसरात छापा मारून ३३ जणांना अटक केली.

आरोपींकडून ७४ मोबाईल, ३ लॅपटॉप, एक लाख २६ हजार ४३० हजारांची रोकड, २८ हजार रुपये किंमतीची विदेशी चलनातील नाणी, कॅमेरे, दुर्बीण, स्पीकर आणि चारचाकी वाहन, असा ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

अटक केलेल्यांमध्ये मध्यप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, उत्तरप्रदेश येथील आरोपींचा समावेश आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपींनी स्टेडियमलगतच्या घोरावडेश्वर डोंगर तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा वापर केला.

तेथून दुर्बिणीने सामन्याचे निरीक्षण करून बेटिंग घेत होते. यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News