Charger Rules : स्मार्टफोन, लॅपटॉप सारखे उपकरण वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता इथून पुढे या सर्व उपकरणांसाठी एकच चार्जर असणार आहे. पर्यावरणाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.
सध्या प्रत्येक उपकरणसाठी वेगवेगळा चार्जर वापरला जात आहे. आता हे चार्जर कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता स्वस्त असो किंवा महाग एकच चार्जर विकत घ्यावा लागणार आहे.

सिंगल चार्जर ऑफर करण्याचे कारण काय आहे
ई-कचरा कमी करण्यासाठी टाइप-सी चार्जरला भारतात कॉमन चार्जर बनवले आहे. प्रत्येक स्मार्टफोनसाठी वेगळा चार्जर बसवल्यामुळे ई-कचरा दिवसेंदिवस वाढत होता, सरकारने ही समस्या गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे टाइप सी चार्जरला मानक केबल बनवण्यात आले आहे.
टाइप-सी चार्जिंग केबलचा वापर स्मार्टफोन, लॅपटॉप, नोटबुक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी केला जाणार आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने असे म्हटले आहे की स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी टाइप-सी मानक आणला जाणार आहे.
समजा जर एखाद्या कंपनीने हा नियम पाळला नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. सरकारने हा नियम वापरकर्त्यांच्या गरजा आणि पर्यावरणाचा विचार करून तयार केला आहे. त्यामुळे आता कोणताही बदल शक्य नाही. आगामी काळात तुम्हाला प्रत्येक श्रेणीतील 1 लाख 10 हजार स्मार्टफोनमध्ये केवळ टाइप सी चार्जिंग पोर्ट पाहायला मिळणार आहे.