अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- रस्त्यात टाकलेली लाकडे बाजूला करणार्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील राजापूर मध्ये घडला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संभाजी माधव हासे (वय 52, राहणार राजापुर, ता. संगमनेर ) हे मंगळापूर शिवारातून रात्रीच्या सुमारास आपल्या वाहनातून चालले होते. त्यावेळी रस्त्यात लाकडे पडलेली होती. हासे हे वाहनातून खाली उतरले. त्यांनी लाकडे बाजुला केली.

त्यावेळी एकनाथ गणपत धुमाळ, अनिल एकनाथ धुमाळ, लता अनिल धुमाळ, सोमनाथ दगडू हासे, शाहु अनिल डावरे, अनिल डावरे यांनी तेथे येत संभाजी हासे यांना शिवीगाळ केली.
शाहू डावरेने संभाजी हासे यांच्या कपाळावर हातातील कड्याने मारले व त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून घेतली. तर अनिल डावरेने हासे यांच्या बोटातली सोन्याची अंगठी काढून घेतली. व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत संभाजी हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम