PMKSN : देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
कारण आता 13 वा हप्ता घेण्यापूर्वी शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आले आहे. कारण शेतकऱ्यांच्या एका चुकीमुळे त्यांना येणाऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

या योजनेशी संबंधित केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर12 हप्ते पाठवले आहेत. जर तुमचे नाव या योजनेत नोंदणीकृत असेल, तर लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे. परंतु, आता इथून पुढे या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे नियम पाळावे लागणार आहेत. नाही तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.
हस्तांतरित केला जाणार 13 वा हप्ता
मोदी सरकार लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 13 वा हप्ता हस्तांतरित करू शकते, अशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत सरकारने या योजनेच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांचे 12 हप्ते जमा केले आहेत.
आतापर्यंत मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनेत सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्याच्या फायद्यासाठी काही अटी आणि शर्ती जारी केल्या आहेत.
करावी लागणार ई-केवायसी
योजनेचा हप्ता पाठवण्यासाठी मोदी सरकारने काही अटी घातल्या आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये, सर्वप्रथम, नोंदणीनंतर ई-केवायसी करावी लागणार आहे. सरकारने ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता, अजूनही ई-केवायसीचा पर्याय खुला आहे, तुम्ही कधीही हे काम करू शकता.
फॉलो करा या स्टेप्स
- सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
- त्यानंतर फार्मर्स कॉर्नरमध्ये ई-केवायसीवर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
- ओटीपी टाकून सबमिट करा, येथे ई-केवायसी पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला 13व्या हप्त्याची रक्कम मिळेल.