अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचा ८६ वा दिवस असून महाराष्ट्रातील कष्टकरी बांधव हे सरकारच्या चुकीच्या केलेल्या कारवाईमुळे व तुटपुंज्या पगारामुळे आत्महत्या करून शहीद झाले.
त्यामुळे हा लढा न्यायप्रविष्ट असून सरकारनी ८६ दिवस होऊन सुद्धा दुर्लक्ष केले आहे.याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ”भीक मांगो आंदोलन” करण्यात आले.

एसटी आगारापासून ते एस.टी स्टँड पर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. मायबाप सरकारने एस.टी. कामगारावर भीक मागायची वेळ आणली असून आमची लेकरंबाळ आज उपाशीपोटी असल्यामुळे आम्ही प्रजासत्ताक दिनी भीक मागत आहोत.
तरी या झोपलेल्या सरकारला जाग यावी व त्यांनी कष्टकरी बांधवांना व शहिद झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहून विलीनीकरण घोषित करावे.
आम्हाला आज उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे रस्त्यावरती भीक मागायला लावले त्यामुळे आम्ही सरकारचे आभारी आहोत.
शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनचा हा दुखवटा चालू आहे मात्र सरकारकडून त्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसल्यानं अनेकांनी धक्कादायक पावलं उचलली तर काहींनी आंदोलन पुकारलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम