अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोना काळात कोविडचा प्रसार वाढू नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणारे, मास्क न वापरणारे, सोशल डीस्टन्स न पाळणारे यांच्यावर बेलवंडी पोलिसांनी कडक कारवाई करत १९ फेब्रुवारी ते ८ जून या ४ महिन्यांच्या कालावधीत ३५ लाख ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली.
कोरोनाच्या काळामध्ये विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणारे वाहन चालक, वाहनांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती, मास्क न वापरणारे,
सोशल डिस्टन्स न पाळणारे यांच्यावर बेलवंडी पोलिसांनी १९ फेब्रुवारी ते ८ जून या कालावधीत दंडात्मक कारवाई करत सुमारे ३५ लाख ११ हजार ४०० रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला, अशी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली.
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे,
पोलिस कर्मचारी हसन शेख, पोलिस नाईक संतोष गोमसाळे, ज्ञानेश्वर पठारे, महिला पोलिस काॅन्स्टेबल शोभा काळे, संपत गुंड, बजरंग गवळी, मारुती कोळपे, संदीप दिवटे, रावसाहेब शिंदे, विकास करखीले, होमगार्ड यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम