Best Recharge Plans : आता बिनधास्त वापरा इंटरनेट ! ‘इतक्या’ स्वस्तात दररोज मिळणार 5GB डेटासह खूपकाही; वाचा सविस्तर

Published on -

Best Recharge Plans :तुम्ही देखील दररोज मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरात असाल तर तुमच्यासाठी कमी डेटा ही एक मोठी समस्या असते त्यामुळे तुम्ही देखील कमी किमतीमध्ये जास्त डेटा रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर आम्ही तुम्हाला आज या बातमीमध्ये काही जबरदस्त रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 5 GB डेटा मिळतो. चला तर जाणून घ्या या जबरदस्त रिचार्जबद्दल संपूर्ण माहिती.

Vi 599 प्लॅन

या प्लॅनची वैधता 70 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच, दररोज 100 एसएमएस सुविधा देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये डेटा वीकेंड रोलओव्हरही दिला जात आहे.

Airtel 599 प्लॅन

या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह अनलिमिटेड मेसेजिंग सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे दररोज जास्तीत जास्त 100 एसएमएस सुविधा उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये Disney + Hotstar VIP चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Jio 599 प्लॅन

या प्लॅनमध्ये 84 दिवसांची दीर्घ वैधता ऑफर केली जात आहे. यासोबतच दररोज 2 जीबी डेटाची सुविधा मिळणार आहे. यासोबतच दररोज 100 एसएमएस दिले जातील. तथापि, या प्लॅनमध्ये Dinsey + Hotstar चे सबस्क्रिप्शन उपलब्ध होणार नाही.

 

BSNL 599 प्लॅन

BSNL च्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 5GB डेटा दिला जात आहे. हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस सुविधा देण्यात आली आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत दाबून अमर्यादित डेटा खर्च करता येईल.

हे पण वाचा :- 11 Seater Car: ‘ह्या’ 11 सीटर कारने वाढवले Innova चे टेंशन ! किंमत आहे फक्त ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe